शाळेतील सँडविच खाल्ल्याने 350 मुलांना विषबाधा; पुण्यातील संतापजनक प्रकार

99 0

पिंपरी चिंचवड मधील विद्यार्थ्यांना शाळेतील सँडविच खाल्ल्याने विषबाधा झाल्याची गंभीर घटना घडली आहे. हे घटना पिंपरी चिंचवड मधील शाहूनगर भागात असलेल्या डी वाय पाटील शाळेत घडली.

या शाळेतील पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आज अल्पोपहार म्हणून ब्रेडला चटणी लावून सँडविच बनवून देण्यात आले होते. हेच सँडविच खाऊन अनेक विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळल्यासारखं होऊ लागलं. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं.

शाळेतील हे सँडविच खाल्ल्याने जवळपास साडेतीनशे मुलांना विषबाधा झाली आहे. काही विद्यार्थ्यांना उलट्या झाल्या तर काहींना मळमळ होऊ लागली. काही विद्यार्थी तर चक्कर येऊन पडले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. काही विद्यार्थ्यांना पालकांबरोबर घरी पाठवण्यात आलं. मात्र या घटनेची माहिती मिळताच पालकांमध्ये एकच खळबळ उडाली. पालकांनी शाळे बाहेर आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर शाळा प्रशासनाने पालकांची माफी मागत दिलगिरी व्यक्त केली आहे.

डी वाय पाटील शाळा प्रशासनाकडून लहान मुलांच्या प्रकृतीशी हेळसांड करण्यात आली असून शाळेच्या हलगर्जीपणामुळे आज विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. त्यामुळेच शाळा प्रशासनावर निकृष्ट अन्न पुरवल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

Share This News
error: Content is protected !!