MVA Loksabha Formula

हरियाणात हार, मविआत वाद; महाविकास आघाडीच्या बैठकीतील INSIDE बातमी

160 0

नुकत्याच पार पडलेल्या हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभेत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं.

हरियाणा मध्ये स्वबळावर काँग्रेसनं सर्व म्हणजे 90 जागा लढवल्या यापैकी केवळ 36 जागांवर काँग्रेसला यश आले तर जम्मू-काश्मीरमध्ये जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स या फारुख अब्दुल्ला यांच्या पक्षाबरोबर काँग्रेस पक्षाने आघाडी केली होती यात काँग्रेसला अवघ्या सहा जागा मिळाल्या आहेत तर नॅशनल कॉन्फरन्स पक्षाला 42 जागा मिळाल्या आहेत.

हरियाणातील मोठ्या पराभवानंतर त्याचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटताना पाहायला मिळत असून आज झालेल्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भाच्या बैठकीत खडाजंगी झाल्याची बातमी समोर आली आहे.

महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत नेमकं काय झालं? 

  • चुकीचं जागावाटप नको, महाविकास आघाडीच्या बैठकीत नेत्यांचा सूर 
  • हरियाणातील पराभवानंतर दिल्लीतील काँग्रेस नेत्यांचं महाराष्ट्रावर लक्ष 
  • मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, स्वबळावर लढायचं असेल तर लढा 
  • खासदार संजय राऊत काँग्रेसवर संतापले
Share This News
error: Content is protected !!