Pune Crime News

पुण्यातील महिलेचं अपहरण, कर्जतच्या जंगलात नेऊन अत्याचाराचा प्रयत्न;नेमकं प्रकरण काय ?

271 0

पुण्यातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील एका 32 वर्षीय महिलेचं अपहरण करून तिला थेट कर्जतच्या जंगलात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. हे अत्याचार महिलेच्या ओळखीच्या एका व्यक्तीने केले असून आता या इसमासह एका सह आरोपी महिलेवरही पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात 32 वर्षीय महिलेचं अपहरण करून तिला थेट कर्जतच्या जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा एक गुन्हा समोर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार ही महिला पुण्यातील सहकार नगर परिसरामध्ये राहते. या महिलेच्या ओळखीच्याच एका व्यक्तीने तिचं अपहरण केलं. तिला दोन दिवस घरात डांबून ठेवून मारहाण केली गेली. त्यानंतर तिला कार मध्ये बसवून कर्जतच्या जंगलात नेलं. तिथेही तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडलं तिला मारहाण केली आणि जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचे प्रयत्न करण्यात आले. या प्रकरणी 36 वर्षीय आरोपी विरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याबरोबरच एका सह आरोपी महिलेवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी प्राथमिक माहिती सध्या हाती आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात दररोज दोन ते तीन गंभीर स्वरूपाच्या लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता ही आणखी एक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. मात्र या घटनांमुळे पुण्यात नेमकं चाललय तरी काय ? आणि कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय ?

Share This News
error: Content is protected !!