जिंकलास लका! गुलीगत फेम सुरत चव्हाण बिग बॉस मराठी पाच सीझनचा विजेता

714 0

मागील 70 दिवसापासून गुलिगत धोका झापूक झुपुक या आपल्या हटके अंदाजानं महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सुरज चव्हाण हा बिग बॉस मराठीत च्या पाचव्या सीझनचा विजेता ठरला आहे तर अभिजीत सावंत हा उपविजेता ठरला आहे.

बारामतीतील एका छोट्याशा गावात जन्मलेल्या सुरजने अत्यंत कठीण परिस्थितीतून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. सूरजच्या आई वडिलांचं तो लहान असतानाच निधन झाल. सूरजला चार सख्या बहिणी आणि एक आत्या आहे. सुरजच्या वडिलांचे कॅन्सरने निधन झाले.आणि हा धक्का त्याची आई सहन करू शकली नाही. त्याच्या आईचे आणि आजीचे एकाच दिवशी निधन झाले. तो काळ सूरजसाठी खुप मुश्किल आणि कठिण होता.

त्यानंतर आता त्याने असं काही केलं ज्याचा कोणी विचारही केला नसेल. त्याच्या प्रवासाची सुरुवात टिकटॉकपासून झाली. तो टिकटोकवर छोट्या छोट्या व्हिडीओ बनवायचा आणि इथूनच तो ‘गुलिगत धोका’ म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याचे भन्नाट डायलॉग आणि डांस हे लोकांना आवडू लागले. गरीब कुटुंबातून आलेला सुरज माथाडी कामगार म्हणून काम करत होता. त्याची साधेपणामुळे आणि मेहनती वृत्तीमुळे तो बिग बॉसच्या घरात सर्वांचा लाडका बनला.

सुरजने शोमध्ये अनेक आव्हाने पार करत, आपल्या प्रामाणिक आणि नम्र वागण्यामुळे सर्वांची मनं जिंकली. बिगबॉसच्या घरात त्याला सुरुवातिला त्रास झाला, त्याला गेम समजायला थोडा वेळ लागला पण त्याच्या शांत स्वभावामुळे ,कामगिरीमुळे आणि साध्या वागणुकीमुळे प्रेक्षकांनी त्याला खूप मोठा पाठिंबा दिला.

बिगबॉसच्या घरात कोणतेही वाद न घालता, कोणाचाही अपनाम किंवा कोणतीही मर्यादा न ओलांडताना त्याने बिगबॉसचा खेळ खेळला आणि बिगबॉसचा फायनलिस्ट बनला.

बिगबॉसच्या घरातल्या लोकप्रिय व्यक्तींना पण मागे टाकत त्याने या गाळलेल्या पर्वाचा तो विजेता ठरला. त्याने अंतिम फेरीत अभिजित सावंतला पराभूत करत १४.६ लाख रुपये रोख रक्कम आणि एक इलेक्ट्रिक स्कूटर जिंकली .सुरजच्या या यशस्वी प्रवासामुळे तो सामान्य जनतेसाठी प्रेरणास्थान बनला आहे.

Share This News
error: Content is protected !!