Lalit Patil

ड्रग्स माफिया ललित पाटीलला मदत केल्याचा आरोप असलेले बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत

202 0

पुण्यातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात बडतर्फ करण्यात आलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकासह पाच जणांना पुन्हा सेवेत घेण्यात आलं आहे. या बातमीने एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस उपनिरीक्षक मोहिनी अविनाश डोंगरे, पोलीस हवालदार राजेश जनार्दन काळे ,नाथाराम भारत काळे, दिगंबर विजय चंदनशिव आणि अमित सुरेश जाधव यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलं होतं. पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रग्सची तस्करी करण्यासाठी ललित पाटील याला मदत केल्याच्या आरोप या पोलिसांवर होता. याच बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे अपील केले होते. ज्यामध्ये त्यांच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे या पोलीस कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे.

नियंत्रण कक्ष आणि पोलीस मुख्यालय या ठिकाणी या बडतर्फ पोलिसांशी नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रकरणात सहभाग आढळलेल्या पोलिसांना पुन्हा सेवेत घेतल्याने गृह विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या पोलिसांना पुन्हा सेवेत का घेतलं ? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

Share This News
error: Content is protected !!