ब्रेकिंग न्यूज

माझिया मराठीची बोलू कौतुके…; अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली असून अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत. गृह मंत्रालयाने 2005 साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले.

मराठीसह पाली, आसामी, प्राकृत आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मोठी घोषणा केली आहे