बदलापूर अत्याचार प्रकरण: अखेर संस्थाचालक आणि सचिव यांना अटक

184 0

बदलापूरमधील दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघेही लपून बसले होते. अखेरीस पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळा चेअरमन उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या दोघांनी हायकोर्टामध्ये अटकपूर्वी जामीन अर्ज दाखल केला होता. पण हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. ठाणे पोलिसांनी कर्जत परिसरातून दोघांना ताब्यात घेतलं आहे. या दोघांनाही उद्या गुरुवारी कोर्टात हजर करणार आहे.

Share This News
error: Content is protected !!