नवनीत राणा व रवी रणा यांच्यावर गुन्हा दाखल करा ; काँग्रेसच्या संगिता तिवारी यांची मागणी

574 0

राज्यात सध्या हनुमान चालीसावरून राजकारण तापले असताना मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणणारच असा आक्रमक पवित्रा घेणाऱ्या राणा दाम्पत्याला काल खार पोलिसांनी अटक केल्यानंतर आता पुण्यात राणा दंपत्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष संगीता तिवारी यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात राणा दाम्पत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

खार पोलिसांनी अटक केल्यानंतर राणा दाम्पत्यांना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अवमानकारक शब्द उच्चारले असून याप्रकरणी त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी तिवारी यांनी केली आहे

Share This News
error: Content is protected !!