अक्षयचा एन्काऊंटर झालेल्या पोलीस व्हॅनमध्ये आढळल्या “या” धक्कादायक गोष्टी

318 0

बदलापूरमध्ये चार वर्षांच्या चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला. तळोजा कारागृहातून मुंब्रा मार्गे ठाण्याला जात असताना मुंब्रा देवीच्या परिसरात अक्षयचा एन्काऊंटर करण्यात आला. अक्षय शिंदे यांनी सुरुवातीला पोलिसांवर पोलिसांच्या सर्व्हिसरिवॉल्वरमधून गोळीबार केला आणि पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ झाडलेल्यागोळीमुळे अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. हा संपूर्ण घटनाक्रम पोलीसव्हॅनमध्येच घडला. आणि आता याच पोलीस व्हॅनमध्ये फॉरेन्सिकडिपार्टमेंटला अनेक धक्कादायक गोष्टी सापडल्या आहेत.

या एन्काऊंटर प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास वरीष्ठ पोलीस उपायुक्त पराग मनेरे यांच्याकडे देण्यात आला आहे. ही घटना घडल्यानंतर तात्काळ ज्या व्हॅन मध्ये एन्काऊंटर झाला त्याची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम दाखल झाली होती. ही पोलीस व्हॅन ठाणे पोलिस मुख्यालयाच्या शेजारी पोलिसांच्या परेड ग्राउंड वर ठेवण्यात आली आहे. फॉरेन्सिकच्या टीमने या संपूर्ण व्हॅनची तपासणी केली. यावेळी फॉरेन्सिक टीमला व्हॅनमध्ये चार पुंगळ्या म्हणजेच बुलेट शेल सापडले. यापैकी तीन बुलेट सेल या अक्षयने झाडलेल्या गोळ्यांच्या आहेत. तर एक शेल ही अक्षयवर पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी झाडलेली आहे.

याबरोबरच फॉरेन्सिकच्या टीमला या गाडीत दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या रक्ताचे नमुने आढळले आहेत. या रक्ताच्या नमुन्यांची आता तपासणी करून हे रक्त नेमकं कोणाचा आहे याचा तपास केला जाईल.

Share This News
error: Content is protected !!