…. म्हणून शिवसेना अपमानास्पद वागणूक देत आहे; खासदार नवनीत राणा यांचा गंभीर आरोप

389 0

सध्या राज्यात हनुमान चालीसा वरून राजकारण तापलं असतानाच मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याची भूमिका घेणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली आहे.

कलम 153 (A) अंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी राणा दाम्पत्याला खार पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

या नंतर आता खासदार नवनीत राणा यांनी ट्विट करत शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे. मी मागासवर्गीय महिला आहे म्हणून शिवसेनेकडून अपमानास्पद वागणूक मिळत असून आपल्या बद्दल खालच्या पातळीवर बोललं जात आहे असं म्हणत राणा यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

Share This News
error: Content is protected !!