Beed:

पॅन्ट काढली, अश्लील बोलले, मारहाण केली; आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीचा पोलिसांकडून पोलीस ठाण्यातच छळ

176 0

पोलिसांनीच एका लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीचा लैंगिक छळ करत तिला मारहाण केल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे. ही घटना ओडिसा मधील भुवनेश्वर या ठिकाणी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ही भारतीय लष्करातील अधिकाऱ्याची होणारी पत्नी आहे. 15 सप्टेंबर रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास आपले हॉटेल बंद करून ती लष्करी अधिकाऱ्यांसोबत घरी परतत होते. मध्यरात्री वाटेत काही तरुणांनी त्यांना अडवून त्रास देण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मदत मागण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी या दोघांनी भुवनेश्वर मधील भरतपूर पोलीस ठाणं गाठलं. त्यावेळी सिव्हिल ड्रेस मध्ये असलेल्या महिला पोलिसाने त्यांना शिवीगाळ करत तक्रार नोंद करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर आणखी काही पोलीस अधिकारी तिथे आले. आणि त्यांनी थेट या लष्करी अधिकाऱ्याला लॉकअप मध्ये बंद केले. लॉकअप मध्ये बंद करण्यामागे नेमकं कारण काय याचं उत्तरही त्यांनी दिलं नाही. तर एका अधिकाऱ्याला तुम्ही अशा प्रकारे ताब्यात ठेवू शकत नाही. असं या अधिकाऱ्याची होणारी पत्नी म्हणाल्यावर दोन महिला पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केली.

एवढ्यावरच न थांबता पीडित महिलेचे हात आणि पाय बांधण्यात आले. सकाळपर्यंत त्याच अवस्थेत त्यांना ठेवण्यात आलं. सकाळी एका पुरुष पोलीस अधिकाऱ्याने पीडित महिलेची थेट अंतर्वस्त्र काढून तिच्या छातीवर लाथा मारल्या.

पुढचं काही वेळानंतर आणखीन एका अधिकाऱ्याने तिथे येऊन या महिलेची पॅन्ट खाली ओढली. त्यानंतर स्वतःची पॅन्ट काढून प्रायव्हेट पार्ट दाखवत अश्लील टिप्पणी केली. या सगळ्या वेळी मदतीसाठी याचना करू नये पोलीस ठाण्यातील कुणीच या दोघांची मदत केली नाही. पोलिसांनी गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली पीडित महिलेला अटक केली होती त्यानंतर तिला या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर तिने स्वतः या गोष्टीचा खुलासा केला.

याप्रकरणी ओडिसा पोलिसांनी प्रभारी निरीक्षकासह पाच पोलिसांना निलंबित केले आहे. प्रभारी निरीक्षक (आयसीसी) दिनकृष्ण मिश्रा, उपनिरीक्षक बैसालिनी पांडा, सहायक उपनिरीक्षक सलिलामोयी साहू आणि सागरिका रथ आणि कॉन्स्टेबल बलराम हांडा अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावं आहेत. तर या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!