चिंचवड: राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाले असून भाजपाला अनेक नेते सोडून जाताना पाहायला मिळत आहेत अशातच चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप या भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चा जोरदार सुरू होत्या.
मात्र यावर स्वतः अश्विनी जगताप यांनीच आता प्रतिक्रिया दिली असून मी शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार या केवळ चर्चा आहेत कुणीतरी जाणीवपूर्वक अफवा पसरवत आहे मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे आणि भारतीय जनता पक्षासोबतच राहणार असं अश्विनी जगताप यांनी म्हटलं आहे.
चिंचवड विधानसभेसाठी लक्ष्मण जगताप यांचे बंधू आणि अश्विनी जगताप यांचे दीर पिंपरी चिंचवड भाजपाचे जिल्हाध्यक्ष शंकर जगताप हे देखील इच्छुक आहेत आपल्या ऐवजी जर पक्षाने शंकर जगताप यांना उमेदवारी दिली तर त्यांचं काम मोठ्या ताकदीन करून त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करू असंही अश्विनी जगताप म्हणाल्या आहेत.