विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ‘या’ दिवशी महाराष्ट्र भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक

192 0

मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा सज्ज झाला असून भाजपाकडून नुकतीच 34 जणांची निवडणूक व्यवस्थापन समिती ही जाहीर करण्यात आली आहे.

दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक घेत काही सूचना दिल्या होत्या.

त्यानंतर आता 18 सप्टेंबरला महाराष्ट्र भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक होणार असून या बैठकीमध्ये महायुतीत जागावाटप कसा असावा विधानसभेसाठी काय रणनीती असावी यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!