Parbhani News

’10 लाख दे नाहीतर बलात्काराच्या केसमध्ये अडकवेन’; महिलेची एक्स बॉयफ्रेंडला धमकी

179 0

राज्यात महिला अत्याचारांचं प्रमाण वाढलं असून याचाच काही महिला गैरफायदा देखील घेत आहेत. ‘मला 10 लाख रुपये दे, नाहीतर तुला बलात्काराच्या खोट्या केसमध्ये अडकवेन’, अशी धमकी एका महिलेने तिच्या एक्स बॉयफ्रेंडला दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित महिलेसह तिचा पतीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला 21 वर्षांची असताना तिचा एक प्रियकर होता. या दोघांना लग्न करायचं होतं मात्र त्यांच्या नात्याला या महिलेच्या वडिलांनी नकार दिला. त्यानंतर या महिलेने दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केलं. लग्नानंतर मागच्या वर्षी ही महिला तिच्या एक्स बॉयफ्रेंडला पुन्हा भेटली. ‘मला एक हॉटेल सुरू करायचं असून त्यासाठी तू पैसे गुंतवं’, असा आग्रह केला. मात्र त्याने स्पष्ट नकार दिला.

एक्स बॉयफ्रेंडने नकार दिल्यामुळे ‘तुझी कशी बदनामी करते ते बघ’, अशी धमकी या महिलेने त्याला दिली. व या महिलेने आपल्या मित्रांना, कुटुंबीयांना त्यांच्या पूर्वीच्या नात्याबद्दल सांगायला सुरुवात केली. आणि एवढेच नाही तर ‘तू मला दहा लाख रुपये दे, नाहीतर मी तुला बलात्काराच्या खोट्या आरोपांमध्ये अडकवेल. तू पैसे दिले नाही तर मी आत्महत्या करेन. माझा एक भाऊ मोठा अधिकारी आहे. त्याला सांगून तुझ्या विरोधात बलात्काराची केस करेन. त्यानंतर तू बरबाद होशील ‘, अशी धमकी दिल्याचा आरोप या तरुणाने केला.

ही धमकी केवळ महिलेने नाही तर तिच्या पतीनेही या तरुणाला दिली. याबाबत तरुणाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!