‘दादा चल ना’ म्हणून झोपेतून उठून बाहेर नेले अन् कोयत्याने..? घटनेने संपूर्ण पुणे शहरात खळबळ

166 0

पुण्यात कोयता हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पुणे पोलिसांकडून प्रयत्न सुरू असूनही कोयत्याने होणारे हल्ले रोखणं पोलिसांना शक्य झालेलं नाही. अशीच एक घटना पुण्यातील उत्तम शनगर परिसरातील मासे आळीमध्ये घडली. ‘दादा बाहेर चल’ म्हणून मित्राला बाहेर बोलून मित्रांनीच त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. या हल्ल्यात संबंधित तरुणाचा मृत्यू झाला.

जयदीप ज्ञानेश्वर भोंडेकर (वय २२) असे मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी अमित सुदाम गुजर (वय २१,रा. मासे आळी, उत्तमनगर) याला अटक केली आहे.

या गुन्ह्याची तक्रार मृत तरुणाची आई लक्ष्मी ज्ञानेश्वर भोंडेकर (वय ४२, रा. गुजर कॉम्प्लेक्स, उत्तमनगर) यांनी उत्तमनगर पोलिसांत दिली आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी जयदीप घरी झोपला होता. दुपारी साडेबारा वाजता आरोपी अमित गुजर हा त्याच्या घरी गेला. त्याने जयदीपला झोपेतून उठवले. ‘दादा बाहेर एक पोतं उचलायचं आहे, चल ना’ असे बोलून त्याने जयदीपला बाहेर नेले. काही वेळाने घराबाहेर लोक आरडाओरडा करू लागल्यावर जयदीपच्या आईने बाहेर जाऊन पाहिले असता मित्रांनीच जयदीपच्या डोक्यात कोयता मारल्याचे त्यांना समजले. त्यावेळी तात्काळ त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मातृ उपचारावेळी जयदीपचा मृत्यू झाला.

हल्ल्याचा घटनाक्रम

जयदीपवर जुनी मासे आळी येथील राजेंद्र पवार यांच्या घरासमोर हल्ला करण्यात आला. आई तात्काळ घटनास्थळी पोहोचली असतात त्यांना जयदीप रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. तर बाजूलाच जयदीपच्या डोक्यात ज्या कोयत्याने वार केले होते तो कोयता देखील पडला होता. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असतानाही जयदीप ने आईला अमित गुजर याने आपल्याला कोयता मारल्याचे सांगितले. तरी त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत. तर या प्रकरणातील आरोपी अमित गुजर याला पोलिसांनी अटक केली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!