सीईटी परीक्षा आता ऑगस्टमध्ये होणार ; लवकरच जाहीर होणार वेळापत्रक

397 0

मुंबई- तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा 3 ते 10 जून महिन्यात होणार होत्या. मात्र JEE आणि NEET परीक्षांमुळे CET परीक्षा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून लवकरच तारखा जाहीर करणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी JEE ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यात नीट परीक्षेचं वेळापत्रकही याच परीक्षेच्या काळात होतं. म्हणूनच काही विद्यार्थ्यांनी CET परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता उच्च आणि तंत्रशिक्षण मंडळाकडून या मागणीची दखल घेण्यात आली असून परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Share This News
error: Content is protected !!