Breaking News ! जिलेटीनचा स्फोट घडवून एटीएम लुटण्याचा प्रयत्न फसला, पिंपरी चिंचवडमधील घटना

506 0

पिंपरी- पिंपरी चिंचवडच्या तळवडे येथे जिलेटीनच्या साह्याने एटीएममध्ये स्फोट घडवून रोकड पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. चोरटयांनी धाडसी प्रयत्न केला पण एवढे करुनही त्यांना रोकड लुटता आली नाही.

तळवडे येथील त्रिवेणीनगरमध्ये कॅनरा बँकेचे एटीएम आहे. गुरुवारी पहाटे दुचाकीवरून दोन चोरटे या ठिकाणी आले. त्यांनी एटीएमजवळ जिलेटीन कांड्या ठेवल्या आणि पंचवीस मीटर अंतरावर वायर टाकली आणि कशाच्या तरी सहाय्याने विद्युत प्रवाह सोडून हा स्फोट घडवला. पण या स्फोटामुळे केवळ मशिनच्या वरचा पत्रा बाजूला झाला. मशिनमध्ये असलेल्या रोकडच्या वर असलेला जाड पत्रा मात्र तसाच राहिला. मात्र स्फोटाचा मोठा आवाज ऐकून आसपासचे नागरिक जागे झाले. नागरिकांची चाहूल लागताच चोरटे तिथून पळून गेले. त्यामुळे चोरट्याना रिकाम्या हाती पळून जावे लागले. एटीएम मधील ४० लाखांची रोकड सुरक्षित आहे मात्र एटीम सेंटरचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.

चाकणमध्येही याआधी असाच प्रकार

याआधी सुमारे नऊ महिन्यांपूर्वी चाकणमध्ये असाच प्रकार घडला होता. चोरट्यांनी स्फोटकांनी एटीएम उडवलं. मशिन फुटल्यानंतर त्यामध्ये ठेवलेला पैशांचा बॉक्स घेऊन चोरटे पसार झाले. चोरट्यांनी एटीएममधून 28 लाख रुपये लुटले. या एटीएममध्ये 40 लाख रुपयांची रोख रक्कम होती.

Share This News
error: Content is protected !!