पुण्याचे पोलिस सहआयुक्त रवींद्र शिसवे यांची बदली; संदीप कर्णिक पुण्याचे पोलीस सहआयुक्त

398 0

पुण्याचे पोलीस सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांची महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी बृहन्मुंबई येथे पश्चिमत प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची पुणे सह पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे गृह विभागाने आज राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

राज्य गृह विभागाने आज संध्याकाळी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत.

त्यामध्ये अनेक आयपीएस अधिकार्‍यांचा समावेश आहे.

सह पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांची पुणे सह आयुक्त पदावरून बदली झाली असून त्यांची नियुक्ती आता महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई येथे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून करण्यात आली आहे

दरम्यान, अप्पर पोलिस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) बृहन्मुंबई येथे कार्यरत असलेले संदीप कर्णिक यांची पदोन्नतीवर पुणे शहरात सह पोलिस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!