VIDEO: महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्मुला ठरला? कोण किती जागा लढवणार

454 0

विधानसभा निवडणुकीला अवघे 3 महिने शिल्लक असताना सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागलेत. आता महाविकास आघाडीचा 288 जागांसाठी चा जागा वाटपाचा फॉर्मुला निश्चित झाल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात सुरुवात सुरू आहे.

आगामी विधानसभेच्या निवडणुका या ऑक्टोबर महिन्यात होणार असून सर्वच राजकीय पक्ष हे विधानसभा निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागलेत. महाविकास आघाडीचा 288 जागांचा फॉर्मुला निश्चित झाला असून, त्याच पार्श्वभूमीवर नुकतीच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सात ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीची जागावाटपा संदर्भात प्राथमिक बैठक होणार असून, या बैठकीत शिवसेना बुद्ध बाळासाहेब ठाकरे पक्ष 100 जागा, काँग्रेस पक्ष 100 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 80 जागा तर इतर मित्रपक्ष हे 8 जागा लढवणार असल्याची शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्री पदाबाबत चा फॉर्मुला ठरला जाण्याची शक्यता सूत्रांनी दिली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!