Manoj Jarange

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा अटक वॉरंट रद्द

690 0

पुण्यातून मोठी बातमी समोर आली असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा अटक वॉरंट रद्द करण्यात आला असून या प्रकरणी आता पुढील सुनावणी 3 सप्टेंबर रोजी होणार आहे

नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणी पुणे न्यायालयानं मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं. पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणी मनोज जरांगे- पाटील यांच्यासह अन्य दोघांविरोधात पुण्यातील कोथरुड न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात प्रथम न्यायदंडाधिकारी ए.सी.बिराजदार यांनी हे अटक वॉरंट काढले होते. सरकारी वकिलांनी हे अटक वॉरंट रद्द करण्यास विरोध केला. मात्र कोर्टाने मनोज जरांगे पाटील यांचं अटक वॉरंट रद्द केले आहे. तसेच जरांगे पाटील यांना नव्याने बंद पत्र कोर्टाला द्यायला सांगितलं आहे. त्याशिवाय आजमीनपात्र अटक वॉरंट रद्द होणार नाही.

Share This News
error: Content is protected !!