इंस्टाग्रामवर ओळख, विवाहितेवर जडले प्रेम, अडथळा नको म्हणून तिच्याच मुलावर केले वार; पुण्यातील घटनेने खळबळ

472 0

इंस्टाग्रामवर ओळख, विवाहितेवर जडले प्रेम, अडथळा नको म्हणून तिच्याच मुलावर केले वार; पुण्यातील घटनेने खळबळ

 

 

इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून एक तरुणाचे विवाहित महिलेवर प्रेम जडले. मात्र महिलेने नकार दिल्यामुळे संतापलेल्या तरुणाला महिलेच्या मुलावर वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील हडपसर भागामध्ये घडली आहे. याप्रकरणी महिलेने तक्रार दाखल केली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला विवाहित असून तिची आणि आरोपीची दोन वर्षांपूर्वी इन्स्ट्राग्रामवर ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांच्या अनैतिक नात्याबद्दल फिर्यादी महिलेच्या भाच्याला कळली. तेव्हा त्याने दोघांना समज दिली. त्यानंतर महिलेने प्रेम संबंध तोडले. तरीही आरोपी वारंवार फिर्यादीला फोन करत असायचा, तेव्हा फिर्यादीने आता आपल्यात कोणतेही संबंध नाहीत, असे सांगून त्याला परत पाठवून दिले. तरीही रागावलेल्या आरोपीने 31 जुलैला फिर्यादी महिलेचे घर गाठले. महिलेने त्याला निघून जाण्यास सांगितले, तरीही ‘तू माझ्यासोबत चल नाहीतर तुझा जीव घेईन’, असे म्हणून महिलेवर चाकूने हल्ला केला. ज्यामुळे फिर्यादी महिलेच्या हनवटीला चाकू लागला. तू चाकू घेऊन आरोपी महिलेच्या मुलाजवळ जाऊन ‘तुझी मुलं आपल्या प्रेमात अडथळा ठरत आहेत त्यामुळे तुझ्या मुलाचा जीव घेतो’, असे म्हणाला व फिर्यादीच्या तेरा वर्षीय मुलाच्या गळ्यावर वार करून निघून गेला.

या घटनेची माहिती मिळताच तात्काळ हडपसर पोलिसांनी सागर सुर्वे (वय ३०, रा. साखरगाव, ता. फलटण, जि. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू केला. आजच आरोपी सागर याला फलटण मधून ताब्यात घेण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!