Breaking News
DEVENDRA FADANVIS

तीन कारणं!; देवेंद्र फडणवीस होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?

1806 0

नवी दिल्ली: भाजपाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रताप नड्डा अर्थात जेपी नड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर भाजपाचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या चर्चेत राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्यासह सुनील बंसल, तरुण चुंग, शिवराज सिंह चौहान, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, यांची नावं चर्चेत होते.

मात्र भूपेंद्र यादव धर्मेंद्र प्रधान आणि शिवराज सिंह चौहान यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला तर विनोद तावडे यांच्याकडे बिहारच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली गेल्यानंतर आता राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महाराष्ट्रातून एका मोठ्या नावाची चर्चा होत असून हे नाव आहे राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं.

नुकतीच देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस व मुलगी दिविजा फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागण्याच्या चर्चांनी जोर धरला. देवेंद्र फडणवीस यांचं नाव राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या चर्चेत येण्यामागील नेमकी काय कारणं आहेत पाहूया?

  • संघटनात्मक कामाचा अनुभव: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संघटनात्मक कामाचा अनुभव असून 2013 ते 2015 या कालावधीत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र भाजपाचं प्रदेशाध्यक्ष पद सांभाळलं असून देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात भाजपाने 2014 ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवली होती ज्यामध्ये भाजपाचे 122 आमदार निवडून आले आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील भाजपाचे पहिले मुख्यमंत्री बनले. 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या विश्वासातील चेहरा: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या विश्वासातील चेहरा म्हणून पाहिलं जातं. 

 

  • सरकारमधून बाहेर पडण्याची व्यक्त केलेली इच्छा: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला महाराष्ट्रात मोठा धक्का बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत आपल्याला सरकारमधून बाहेर मोकळा करून पक्ष संघटनेमध्ये जबाबदारी द्यावी अशी इच्छा व्यक्त केली होती त्यानंतर तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा योग्य वेळी तुमच्या राजीनामाच्या इच्छेबाबत विचार केला जाईल असं केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना कळवल्याची माहिती समोर येत होती.

जर देवेंद्र फडणवीस भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर नितीन गडकरी नंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील दुसरे नेते असतील

Share This News
error: Content is protected !!