सुधा मूर्ती यांना यंदाचा टिळक पुरस्कार जाहीर; आज दिल्लीत होणार पुरस्कार वितरण सोहळा

512 0

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, राज्यसभा खासदार सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार दिलीय जातो.

टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार अध्यक्ष शरद पवार, खासदार डॉ. शाहू छत्रपती महाराज, केरळचे माजी गृहमंत्री रमेश चेन्निथला या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत. डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणिती रोहित टिळक यांच्यासह ट्रस्टचे अन्य विश्वस्त उपस्थित असतील. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे यंदाचे ४२ वे वर्ष आहे. स्मृतिचिन्ह आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

सुधा मूर्ती यांनी ग्रामीण भागातील विकास तसेच साहित्य व सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. ग्रामीण विकास, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य अधोरेखित करण्यासाठी टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्तांनी सुधा मूर्ती यांची यंदाच्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे.

या अगोदर इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांना हा पुरस्कार दिला असून मागील वर्षाचा टिळक पुरस्कार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला होता

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!