Crime

इंदापुरात खळबळ! शाळेतील क्लार्कने केला अतिप्रसंग, विरोध केल्यामुळे पाजलं कीटकनाशक; अल्पवयीन मुलीचा मृत्यू

468 0

राज्यात महिला अत्याचारांचे प्रमाण वाढलेले असताना इंदापूर मधून देखील एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. यशस्वी शिंदे आणि अक्षता म्हात्रे यांच्या पाठोपाठ आरोपीने अतिप्रसंग करून एका अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना इंदापुरात घडली. या घटनेत पीडित मुलीचा नाहक बळी गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत कारकून असणारा आरोपी 14 वर्षीय मुलीवर नजर ठेवून असायचा. ही मुलगी नववीत शिक शत होती. 28 जुलैला रविवारी सुट्टीच्या दिवशी आरोपीने मुलीच्या घरी जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याला या मुलीने कडाडून विरोध केला. त्यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने मुलीला कीटकनाशक पासून तिच्याबरोबर बळजबरी केली. ज्यामुळे पिडीत मुलीच्या शरीरावर परिणाम झाले. तिला तात्काळ अकलूज मधील खाजगी रुग्णालयात करण्यात आले होते. मुलीवर उपचार सुरू होते आणि उपचारादरम्यान आज या मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, रणजित जाधव नामक आरोपीने आपल्या घरी येऊन बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिकार केल्याने आरोपीने मुलीला कीटकनाशक पाजले. त्यामुळे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पीडीत अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आरोपी विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!