राज्यात एक ऑगस्ट पासून फास्टॅगच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. येत्या नवीन महिन्यापासून म्हणजेच एक ऑगस्ट पासून नवे नियम लागू होणार आहेत. हे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागू शकते.
नवे नियम कोणते ?
• पाच वर्षे जुना फास्टॅग कंपन्यांना प्राधान्याने बदलावा लागणार
• तीन वर्षे जुन्या फास्टॅगचे KYC पुन्हा करावे लागणार
• वाहन नोंदणी क्रमांक, चेसिस क्रमांक फास्टॅगशी लिंक केलेला असावा
• फास्टॅग मोबाईल क्रमांकाचे लिंक करणे अनिवार्य
• KYC पडताळणी प्रक्रियेसाठी ॲप, व्हाट्सअप सेवा आणि पोर्टलसारख्या सेवा उपलब्ध करून द्याव्या लागणार
• कंपन्यांना 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत केवायसी पूर्ण करावे लागणार
• नवीन वाहनाचा नंबर 90 दिवसांच्या आत फास्टॅग अपडेट करणे अनिवार्य
• फास्टॅग सेवा कंपन्यांनी वाहनांचा डेटाबेस सत्यापित करावा
• केवायसी करताना वाहनाच्या समोर आणि बाजूचे स्पष्ट फोटो अपलोड करावे
फास्टॅग वापरणाऱ्या सर्व वाहन चालकांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कारण फास्टॅग ब्लॅक लिस्टिंगशी संबंधित नियमांवर नव्या नियमांमुळे परिणाम होणार आहेत. परंतु त्या आधीच संबंधित कंपन्यांनी NPCI ने घातलेल्या अटींची पूर्तता करावी लागणार आहे. त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे फास्टॅग ऍक्टिव्हेट राहावा यासाठी 90 दिवसांच्या आत त्यावरून व्यवहार केला गेला हवा. अन्यथा फास्टॅग डीऍक्टिव्हेट होणार आहे. त्यानंतर पुन्हा पोर्टल वर जाऊन एक्टिवेशन ची प्रक्रिया करावी लागेल. टोल भरण्याइतके लांबचे प्रवास न करणाऱ्या वाहन चालकांना या नियमाचा फटका बसणार आहे.