crime

प्रपोजला नकार दिल्याच्या रागातून तरुणीवर लोखंडी रोडने हल्ला; नवी मुंबईतील आणखी एका घटनेने राज्यात खळबळ

270 0

नवी मुंबईतील उरण मध्ये यशश्री शिंदे या वीस वर्षीय तरुणीची निर्घुण हत्या करण्यात आल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले होते. एकतर्फी प्रेमातून बदला घेण्याच्या उद्देशाने दाऊद शेख नावाच्या तरुणाने यशश्रीची हत्या केली. तिच्या चेहऱ्यावर वार करून चेंदामेंदा केला. छिन्नविच्छिन्न अवस्थेत तिचा मृतदेह झुडपात टाकून दिला. या घटनेमुळे उरणमध्ये खळबळ उडाली असतानाच आता एकतर्फी प्रेमाची आणखी एक तरुणी शिकार झाली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

एकतर्फी प्रेमातून न्हावे गावातील एका तरुणीच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. तर प्रितम अरुण म्हात्रे असे संबंधित तरुण तरुणाचे नाव असून तो पोलिसांच्या अटकेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रितम म्हात्रे याचे एका तरुणीवर प्रेम होते. त्याने दोन वर्षांपूर्वी या तरुणीला प्रपोज केले होते. परंतु त्या तरुणीने त्यावेळी त्याला नकार दिला होता. त्याचाच राग प्रीतमच्या डोक्यात होता. 26 जुलै रोजी नावे गावाजवळ असलेल्या माणिक टोक या समुद्रकिनारी संबंधित तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसली होती. तेव्हा प्रीतम तिथे आला आणि काही कळण्याच्या आतच त्याने लोखंडी रॉडने तरुणीच्या डोक्यात व पाठीवर जोरदार वार केले. या हल्ल्यात तरुणीच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात. हे तरुणीच्या डोक्याला दहा टाके पडले असून तिची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू आहे.

या प्रकरणी प्रितम म्हात्रे विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटकही झाली आहे. मात्र प्रीतमला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!