चिखलीमधील ९ वर्षीय मुलाच्या खून प्रकरणी आरोपीला अटक

508 0

पिंपरी- पिंपरी चिंचवड शहरात चिखली परिसरातील हरगुडे वस्तीमध्ये लक्ष्मण देवासी या नऊ वर्षाच्या मुलाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येचे गूढ उलगडले असून या प्रकरणी चिखली पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

बपील अहमद रईस असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्‍मण देवासीचे वडील बाबूराम देवासी आणि आरोपी बपील अहमद रईस हे एकाच इमारतीमध्ये राहात असून एकमेकांच्या ओळखीचे आहेत. बपील अहमद रइस याने पैशांसाठी लक्ष्मण देवासीचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडे एक लाख रुपये खंडणी मागण्याचा कट रचला होता.

लक्ष्मण हा बपील रइसच्या ताब्यात असताना आरडाओरडा केल्याने रईसने लक्ष्मणचा डोक्यात दगड घालून खून केला. लक्ष्मण बेपत्ता झाल्यामुळे त्याचा शोध घेतला. मात्र तो कुठेच सापडला नाही. दुसऱ्या दिवशी चिखली परिसरातील एका बंद पडलेल्या पत्र्याच्या घरामध्ये लक्ष्मणचा मृतदेह आढळून आला.

 

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide