हरिभाऊ बागडेंनंतर कोण होणार फुलंब्रीचा आमदार? भाजपामध्ये तब्बल ‘इतके’जण इच्छुक

1775 0

महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि फुलंब्री विधानसभेचे विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे यांचे राजस्थानच्या राज्यपालपदी वर्णी लागले आहे. हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल झाल्यामुळे फुलंब्रीचा पुढचा आमदार कोण असणार याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात यावरचा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट…

सक्रिय राजकारणातून निवृत्तीची हरिभाऊ बागडे यांनी घोषणा केल्यानंतर त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदरच हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी वर्णी लागली आहे… हरिभाऊ बागडे राज्यपाल झाल्याने फुलंब्रीच्या विधानसभेच्या आखाड्यात कोण उतरणार या चर्चांना उधाण आलं असून भाजपामध्ये अनेक इच्छुक चेहरे पाहायला मिळत आहेत. फुलंब्री विधानसभेसाठी भाजपाकडून कोण इच्छुक आहे पाहूया

अनुराधा चव्हाण: भाजपाकडून फुलंब्री विधानसभेसाठी इच्छुकांच्या यादीत सर्वात प्रबळ दावेदार म्हणून अनुराधा चव्हाण यांच्याकडे पाहिले जात आहे. अनुराधा चव्हाण या भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य असून छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेमध्ये महिला व बालविकास सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे 

डॉ. राधाकिशन पठाडे: फुलंब्री विधानसभेसाठी भाजपकडून डॉ. राधाकिशन पठाडे देखील इच्छुक असून राधाकिशन पठाडे हे छत्रपती संभाजी नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असून भाजपाचे छत्रपती संभाजी नगर तालुकाध्यक्ष म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी आहे. 

या नावाने खेरीज भाजपामधून सुहास शिरसाट, विजय औताडे, रामभाऊ शेळके दामूअण्णा नवपुते, राजेंद्र साबळे आधी इच्छुक आहेत

Share This News
error: Content is protected !!