राज्याला हादरवून टाकणाऱ्या यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात

415 0

संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारी घटना उरण शहरात घडली होती. 20 वर्षीय यशश्री शिंदे नावाच्या तरुणीची हत्या करून अतिशय छिन्नविच्छिन्न अवस्थेत तिचा मृतदेह विटंबना करून टाकून दिल्याचे आढळून आले होते. याप्रकरणी आरोपीचा शोध सुरू होता आणि अखेर आज हा आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे.

पुरण शहरात राहणारी यशश्री शिंदे ही 20 वर्षीय तरुणी दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. तिचा शोध सुरू असतानाच यशश्रीचा मृतदेह काल कोटनाका पेट्रोल पंपाजवळ आढळून आला. यशश्री च्या चेहऱ्याचा अक्षरशः चेंदामेंदा करण्यात आला होता. प्रायव्हेट बॉडी पार्ट वर जखमा आढळल्या. त्यामुळे हे प्रकरण समोर येताच नवी मुंबईत संतप्त वातावरण झाले होते. नागरिकांच्या मोठ्या आक्रोशाला सामोरे जावे लागले. त्यामुळे युद्धपातळीवर पोलीस आरोपीचा शोध घेत होते. त्यानंतर आता हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशश्री तिच्या कुटुंबीयांसह उरण येथे राहत असून ती बेलापूरमधील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती. 25 जुलैला सकाळी कामावर निघाल्यापासून यशश्री बेपत्ता होती. तिचा फोन लागत नसल्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. ती कुठेच आढळून आली नाही म्हणून अखेर त्यांनी पोलिसात धाव घेतली. यशश्री बेपत्ता असल्याची तक्रार नोंद करण्यात आली. दोन दिवस पोलीस यशश्रीचा शोध घेत होते. त्यावेळी तिचे कॉल रेकॉर्डिंग चेक केले असता, ती दाऊद शेख नावाच्या एका मुलाबरोबर सातत्याने फोनवर बोलत असल्याचे आढळून आले. जेव्हापासून यशश्री बेपत्ता होती तेव्हापासून दाऊद चा फोन देखील बंद असल्याने ते दोघे एकत्र असतील अशी शक्यता पोलिसांना होती. मात्र तपासादरम्यान यशश्रीचा विटंबना केलेला मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. आणि तात्काळ पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपीचा शोध सुरू केला. यशश्री च्या वडिलांनी देखील दाऊद शेख वर संशय व्यक्त करत एकतर्फी प्रेमातून आपल्या मुलीची हत्या झाल्याचा आरोप केला. संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सात पथके तयार करण्यात आली होती आणि अखेर हा संशयित महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर आढळून आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रेम होते तर हत्या का ?

मिळालेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये यशश्री 14-15 वर्षांची असताना दाऊदचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. त्यावेळी तिने व तिच्या कुटुंबीयांनी याच दाऊद शेख विरोधात पॉक्सो अॅक्टअंतर्गत एफआयआर दाखल केली होती. त्या प्रकरणात तो बराच काळ तुरुंगात होता. तुरुंगातून परत आल्यानंतर त्याने यशश्री ची माफी मागितली. व पुन्हा तिच्याशी प्रेमाने बोलून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. अनेक दिवसांपासून ते दोघेही बराच वेळ फोनवर बोलायचे, असे कॉल रेकॉर्डिंग मधून स्पष्ट झाले आहे. पण यावेळी नेमकं त्यांच्यामध्ये काय संवाद व्हायचा हे स्पष्ट झालेले नाही. जर खरंच दाऊदचे यशश्रीवर एकतर्फी प्रेम होते तर त्याने तिचा इतका निर्घुण खून का केला ? त्यांच्यामध्ये नेमकं काय बोलणं होत होतं ? हत्या करण्याआधी यशश्रीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते का ? या सगळ्याचा तपास पोलीस करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!