Congress

महाविकासआघाडीतील जागावाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसने नेमली समिती; ‘या’ नेत्यांचा समितीत समावेश

2546 0

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आणि कंबर कसली असताना आता काँग्रेस मधून एक मोठी बातमी समोर आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसकडून समिती गठित करण्यात आली असून या समितीमध्ये दहा नेत्यांचा समावेश करण्यात आलाय.

या समितीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतील सात नेत्यांचा तर मुंबई काँग्रेस कमिटीतील तीन नेत्यांचा समावेश झाला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री अरिफ नसीम खान, माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा समावेश झाला आहे तर मुंबई काँग्रेस कमिटीतून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष विधान परिषद आमदार भाई जगताप माजी मंत्री असलम शेख यांचा समावेश करण्यात आला आहे

Share This News
error: Content is protected !!