पूजा खेडकर यांच्या कारनाम्यांनंतर यूपीएससीला आली जाग; केले ‘हे’ मोठे बदल

658 0

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीची फसवणूक केल्यानंतर आता यूपीएससी खडबडून जागी झाली आहे. त्याचबरोबर यूपीएससीने परीक्षा प्रक्रियेत फसवणूक आणि गैरप्रकार टाळण्यासाठी काही बदल देखील केले आहेत.

विद्यार्थ्यांकडून केली जाणारी फसवणूक आणि गैरप्रकार रोखण्यासाठी काही कठोर उपाय योजना आणि बदल यूपीएससी करणार आहे. आता परीक्षा प्रक्रियेत डिजिटल बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रणालीत ‘हे’ बदल होणार

1. आधार क्रमांकावर आधारित फिंगरप्रिंट प्रमाणीकरण किंवा डिजिटल फिंगरप्रिंट कॅप्चरिंग

2. उमेदवारांसाठी चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान

3. ई-ॲडमिट कार्डसाठी क्यूआर कोड स्कॅनिंग

4. परीक्षेदरम्यान एआयवर आधारित सीसीटीव्ही सर्व्हेलन्स सिस्टीम

पूजा खेडकरांचे ‘प्रताप’

पूजा खेडकर यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून स्वतःची आयएएस पदी वर्णी लावून घेतली. तर 40 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असूनही ओबीसी आरक्षणाचा फायदा घेतला. बनावट नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट सादर केले. त्याचबरोबर नावात बदल करून यूपीएससी परीक्षेचे जास्त अटेम्प्ट दिले. एवढे सगळे घोळ खेडकर यांनी घालूनही लोकसेवा आयोगाच्या यंत्रणेला याबाबत शंका आली नाही. मात्र एका आलिशान गाडीवर महाराष्ट्र शासनाची पाटी आणि अंबर दिवा लावलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि ती गाडी पूजा खेळकर यांची असल्याचे उघड झाले. त्यानंतर खेडकर यांचे हे सर्व प्रताप माध्यमांच्या आणि आयोगाच्या समोर आले.

Share This News
error: Content is protected !!