पुण्यात पावसाचा कहर; उद्या पुणे,पिंपरी-चिंचवड सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आदेश

926 0

पुणे पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचलं आहे. अनेक सोसायट्यांमध्ये ही पाणी साठला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.

याच पार्श्वभूमीवर पुणे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

पुणे पिंपरी चिंचवड शहरासह भोर मावळ या भागातील त्याचबरोबर घाटमाथ्यावरील सर्व शाळा यांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश दिवसे यांनी दिले आहेत.

Share This News
error: Content is protected !!