पुणे व पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पाऊस सुरू असून या मुसळधार पावसानं पवना धरण 72% टक्के क्षमतेने भरले आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता व धरणात येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार पवना धरणातून कधी ही धरणाच्या सांडव्यावरून पवना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे.
तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना याद्वारे सुचित करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील शेती पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्याचं आवाहन पाटबंधारे विभागाने केला आहे
सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे अशी विनंती पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आली आहे