पुण्यात मुसळधार पाऊस! ‘या’ पाच सोसायटीमध्ये पाणीच पाणी

332 0

पुणे: पुणे शहरात मुसळधार पाऊस सुरू असून या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून पुणे शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

खडकवासला धरणातून पहाटे ३ वाजेपासून २२ हजार ८८० क्यूसेक विसर्ग होत असून पडणारा पाऊस लक्षात घेता सकाळी ६ वाजेपासून ४० हजार क्यूसेक करण्यात आला आहे.

या मुसळधार पावसामुळे पुण्यातीलएकता नगरी सिंहगडरोड, द्वारका, जलपुजन, शारदा सरोवर, शाम सुंदर या सोसाट्यांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. पार्किंगमध्ये पाणी आल्यानं वाहनांचंही नुकसान झाल्याची माहिती आहे.

Share This News
error: Content is protected !!