Crime

बुलढाणा हादरलं! आधी चिमुकल्याचा गळा आवळला नंतर उकिरड्यात पुरलं

1168 0

बुलढाणा शहराला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. एका चिमुकल्याचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. नंतर पुरावे लपवण्यासाठी मृतदेह पुरण्यात आला. या घटनेने संपूर्ण बुलढाण्यात एकच खळबळ उडाली आहे.

बुलढाण्यातील गावात राहणाऱ्या एका दहा वर्षीय अरहान नावाच्या मुलाचे अपहरण झाल्याची घटना समोर आली होती. त्या अनुषंगाने पोलीस मुलाचा शोध घेत होते. चौकशी आणि तपासादरम्यान पोलिसांना त्याच गावामध्ये राहणाऱ्या अन्सार शेख नावाच्या नातेवाईकावर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी लागलीच अन्सारला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यानेच अरहानचे अपहरण करून गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली. एवढ्यावरच न थांबता निर्दयी अन्सारने पुरावा नष्ट करण्यासाठी अरहानचा मृतदेह उकिरड्यात पुरला. आरोपीने कबुली देताच पोलिसांनी अरहानचा मृतदेह उकिरड्यातून काढून ताब्यात घेतला व आरोपी अन्सार शेख याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांवर आणि चिमुकल्या अरहानच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. नातेवाईक असलेल्या अन्सार शेखने अरहानची निर्घुण हत्या का केली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!