Ravikant Tupkar

रविकांत तुपकरांचं ठरलं! या नव्या पक्षाची केली घोषणा

553 0

शेतकरी चळवळीतील नेते रविकांत तुपकर यांनी आज पुण्यात आपल्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली असून 25 जागा लढवण्याचा देखील रविकांत तुपकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितला आहे.

रविकांत तुपकर यांनी आज पुण्यात शेतकरी चळवळीशी निगडित सर्व लोकांशी बैठक घेतले होते या बैठकीनंतर रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषद देखील घेतली.

महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी या नावाने रविकांत तुपकर यांनी नवा राजकीय पक्ष स्थापन केला असून महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 25 विधानसभेच्या जागा लढवण्याची घोषणा तुपकर यांनी केली आहे.

Share This News
error: Content is protected !!