तू पोलीस ठाण्याच्या बाहेर ये, तुझ्याकडे बघते’, असं म्हणत महिला पोलीसाला मारहाण; पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार

410 0

कायद्याच्या रक्षणकर्त्यांनाच संरक्षणाची गरज आहे का ? असा प्रश्न पडण्यासारखा अनेक घटना पुण्यामध्ये सध्या घडत आहेत. आज देखील कोंढवा पोलीस ठाण्यात एका महिला पोलीस हवालदाराला धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

धक्काबुक्की केल्याप्रकरणी हवालदार शीतल लक्ष्मण जमदाडे (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे. तर साबिया इरम अक्रम खान या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साबिया खान नावाच्या महिलेविरुद्ध किरकोळ वादातून नौशीन फैय्याज शेख यांनी तक्रार दिली होती. त्यावर पाेलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. 22 जुलै रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास साफिया ही कोंढवा पोलीस ठाण्यात आली. तिने थेट पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे यांच्याशिवाय राहण्यास सुरुवात केली. ‘आमच्यामुळे तुमचा पगार होतो. तुम्ही दहावी पास पोलीस आहात. मी उच्चशिक्षित आहे. मी तुमची पोलीस आयुक्तांकडे तक्रार करेन’, अशी धमकी देत तिने पोलीस ठाण्यात गोंधळ घातला.

साबिया खानने गोंधळ घालत असताना पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्याच्या पुस्तिकेचे पान फाडून टाकले. त्यावेळी हवालदार जमदाडे तिथे आल्या. साबियाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने चक्क जमदाडे यांच्या कानशिलात लगावली. एवढेच काय तर ‘तू पोलीस ठाण्याच्या बाहेर ये तुझ्याकडे बघते’, अशी धमकी दिली. यामुळे साबिया खानविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल जाधव तपास करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!