‘एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे मी पैसे घेतले, पण…’ गुणरत्न सदावर्ते यांची न्यायालयात कबुली

273 0

मुंबई- गुणरत्न सदावर्ते यांच्या घराच्या झडतीत कागदपत्रे, रजिस्टर आणि नोटा मोजण्याची मशीन सापडली. एसटी कर्मचाऱ्यांकडून गुणरत्न सदावर्ते यांनी पैसे घेतले होते आणि त्या पैशातून मालमत्ता, गाडी खरेदी केली असा आरोप करत या प्रकरणाच्या तपासाकरता पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली. मात्र गुणरत्न सदावर्ते यांनी पैसे घेतल्याची कबुली देतानाच आपल्या बचावासाठी युक्तिवाद केला.

कोर्टात युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी “सदावर्ते यांच्या घराच्या झडतीत महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या आहेत. कागदपत्रे, रजिस्टर आणि नोटा मोजण्याची मशीन सापडली आहे” अशी माहिती दिली. प्रदीप घरत यांनी हर्षद मेहता प्रकरणाचा निकाल सदावर्ते प्रकरणात रिफरन्स म्हणून वाचून दाखवला. एसटी कर्मचाऱ्यांकडून गुणरत्न सदावर्ते यांनी पैसे घेतले होते आणि त्या पैशातून मालमत्ता, गाडी खरेदी केली. याप्रकरणाच्या तपासाकरता पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली.

त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी स्वत: युक्तीवाद करत आपली बाजू मांडली. सदावर्ते यांच्या बाजूने आज कोर्टात कुणीच वकील आले नसल्याने त्यांनीच आपली बाजू मांडली. गुणरत्न सतावर्ते म्हणाले, “पोलीस हे दाखवण्याचा प्रयत्न करतायेत की हा एक मोठा स्कॅम आहे. मी 300 ते 500 रुपये घेतले पण ते फक्त कोर्ट कामकाजाकरता घेतले. एवढे कमी पैसे कोणता वकील घेतो हे सांगावे ?” असाही सवाल सदावर्तेंनी उपस्थित केला.

यावेळी झालेल्या युक्तीवादानंतर गिरगाव कोर्टाने गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे गुणरत्न सतावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

Share This News
error: Content is protected !!