वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे शरद पवारांना पत्र; आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण

804 0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रमुख शरद पवार यांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्र लिहून आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले आहे. त्यांच्या सहभागी होण्याची मी वाट पाहत असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले आहे.

ओबीसी आरक्षण बचाव यात्रा २५ जुलैला चैत्यभूमी, मुंबई येथून सुरू होणार असून त्याच दिवशी पुण्यातील महात्मा फुले वाड्यालाही भेट देण्यात येणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे. काल मंत्री छगन भुजबळ यांनाही ॲड. आंबेडकर यांनी निमंत्रित केले होते. ॲड. आंबेडकर यांचे निमंत्रण स्वीकारून हे नेते आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होणार का ? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

ही यात्रा मुंबई येथून 25 जुलै रोजी निघणार असून पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, जालना आणि औरंगाबाद येथे यात्रेचा समारोप होणार आहे.

https://x.com/Prksh_Ambedkar/status/1815631151941452104?t=2gu8fL795LhrZzvFhBfHQw&s=19

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide