मोठी बातमी ! ‘बिग बॉस सीजन 3’ बंद होणार ? कारण काय, वाचा सविस्तर

3312 0

मोठी बातमी ! ‘बिग बॉस सीजन 3’ बंद होणार ? कारण काय, वाचा सविस्तर

देशभरात प्रसिद्ध असलेला आणि नेहमीच चर्चेत राहणारा रिॲलिटी शो ‘बिग बॉस’ तातडीने बंद करा, अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे केली आहे.

नेमकं कारण काय ?

सध्या ‘बिग बॉस सीजन 3’ हा रिॲलिटी शो सुरू आहे. या शो मध्ये असलेल्या स्पर्धकांपैकी अरमान मलिक आणि कृतिका मलिक हे पती-पत्नी असलेले स्पर्धक कॅमेरात समोर अतिशय विविध, अश्लील आणि किळसवाणे करताना दिसले. या दोघांनी कौटुंबिक नात्याच्या सर्व सीमा पार करत सामाजिक मूल्ये पायदळी तुडवली आहेत, अशी टीका मनीषा कायंदे यांनी केली. त्यांनी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांसह मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली.

यावेळी मनीषा कायंदे म्हणाल्या की, ‘बिग बॉस ३ या शोने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. मोठ्यांसह अनेक घरांमध्ये लहान मुलंही हा शो पाहतात. अरमान मलिक आणि कृतिका मलिक यांच्या वागण्याचा- बोलण्याचा परिणाम मुलांच्या मनावर होतो. त्यामुळे हा शो तातडीने बंद करावा. या शोचे निर्माते आणि प्रक्षेपण करणाऱ्या कंपनीच्या सीईओंवर सायबर गुन्ह्यांच्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करावी. 18 जुलै 2024 रोजी प्रसारित झालेल्या एपिसोड मधील अरमान आणि कृतिका मलिक यांचा किळसवाणा व्हिडिओ सोशल मीडियावरसुद्धा व्हायरल झाला आहे का? याची तपासणी करावी, तसेच या स्पर्धकांवर आणि शोच्या निर्मात्यांवर कठोर कारवाई करावी.’

शिवसेनेच्या या मागणीची दखल घेऊन पोलीस आयुक्त बिग बॉस या शो वर कारवाई करणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान अरमान आणि कृतिका मलिक यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून मलिक पती-पत्नीवर व बिग बॉस शो वर कडाडून टिका होत आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!