BREAKING NEWS: वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

500 0

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकरला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मनोरमा खेडकर यांनी मुळशीतील शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकावल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याने पोलिसात गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर मनोरमा खेडकर यांना महाड मधून पोलिसांनी अटक केली होती.

पहिल्या सुनावणीत मनोरमा खेडकर यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती त्यानंतर पुन्हा त्यात दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची वाढ करण्यात आली होती. ही पोलीस कोठडी आज संपल्याने त्यांना पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात आले होते. आज न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे.

Share This News
error: Content is protected !!