काँग्रेसने वाचली महायुतीच्या पापांची यादी; काँग्रेसकडून महायुतीचे पाप पत्र जारी 

355 0

 

विधानसभा निवडणुका लवकरच सुरू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीकडून एकमेकांवर टीका टिप्पणी आणि पोलखोल केली जात आहे. आज काँग्रेसने अशाच प्रकारे एक पाप पत्र जारी केले आहे. ज्यामधून सरकारवर टीका करत गंभीर आरोप केले आहेत.

पत्रातील महत्त्वाचे मुद्दे

1. ‘खोके सरकार’ने लोकशाहीची थट्टा केली. मुंबईकरांचे दोन लाख कोटी लुबाडले.

2. मुंबईकरांना आपले प्रतिनिधी नगरसेवक म्हणून निवडता आले नाही, यामुळे मुंबईत खड्डे, प्रदूषण वाढले, शहराला भकासपणा आला.

3. भ्रष्ट महायुती सरकारने मंत्रालयाला घोटाळा केंद्र बनवले.

4. दिल्लीश्वरांनी मराठी अस्मितेला ठेच पोहचवून राज्यातील नोकऱ्या, उद्योगधंदे आणि गुंतवणूक गुजरातला नेली.

5. महायुती सरकार हे सावकारांचे सरकार असून केवळ श्रीमंत मित्रांना खुश करत आहे.

6. युती सरकारने धारावी, महालक्ष्मी रेस कोर्स, आरे जंगल आणि कुर्ला डेअरी ची जमीन मित्रांच्या घशात घातली.

7. मुंबईत मुंबईकरांना राहायला जमीन नाही मात्र अदानींना विमानतळ देऊ केले तर 5000 कोटींचे हॉस्पिटल लोढा यांना विकले.

8. खोके सरकारच्या विफल आरोग्य सेवेमुळे बीएमसी ला 27% कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे.

9. वैद्यकीय सेवा व औषधांच्या अभावामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.

10. जेजे, जीटी, सेंट जॉर्ज, कामा अशा महत्त्वाच्या रुग्णालयांना मोफत आरोग्य सेवेतून वगळून ‘सावकारांच्या सरकार’ने मुंबईकरांना आरोग्यसेवेपासून वंचित ठेवले.

11. राज्यसह मुंबईत गुन्हे वाढले. मुंबईत रोज सरासरी 1 बलात्कार आणि 6 विनयभंगाच्या घटनांवरून घडतात. यावरूनच महिलांचे रक्षण करण्यात गृहमंत्री फडणवीस अपयशी ठरले आहेत.

12. मुंबईत होर्डिंग दुर्घटनेत होर्डिंग खाली पडलेल्या प्रेतांकडे दुर्लक्ष करत ‘सावकारांच्या सरकारने’ रोड शो केला.

13. भ्रष्ट युतीतील नेते पोलीस ठाण्यात गोळीबार करतात.

14. शिंदेंच्या नेत्याने निष्पाप मुंबईकर महिलेला गाडीखाली चिरडले, या सावकारांच्या सरकारने आरोप पत्रही दाखल केले नाही.

15. ‘सावकार सरकार’ तरुणांना बेकारी, बेरोजगारीत ढकलत आहे. NEET सारख्या परीक्षांचे पेपर लीग होणे हा सरकारच्या अपयशाचा दाखला आहे.

16. ‘गुंड-युती’ सरकार गुन्हेगारीला प्रोत्साहन देते.

अशा प्रकारचे खळबळ जनक आरोप काँग्रेसने पाप पत्रातून महायुती सरकारवर केले आहेत. त्याला आता महायुती प्रत्युत्तर देणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!