पूजा खेडकर प्रकरणात UPSC पाठोपाठ मागासवर्ग आयोग देखील ॲक्शन मोडमध्ये; उगारला कारवाईचा बडगा
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या विरोधात यूपीएससीने तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर नाव, पत्ता यामध्ये बदल करून आणि खोटे दिव्यांग प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे. यूपीएससीच्या या कारवाईनंतर आता मागासवर्ग आयोगाने देखील पूजा खेडकर प्रकरणात कारवाईचा बडगा उगारला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पूजा खेडकर त्यांनी ओबीसी आरक्षणाचा गैरवापर केला आहे का ? तसेच जात प्रमाणपत्र वैध आहे का ? केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडून हे तपासले जाणार आहे. चाळीस कोटींपेक्षा जास्त संपत्ती असूनही पूजा खेडकर यांनी आरक्षणाचा लाभ घेतला. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट दाखवून त्यांनी नोकरी मिळवली. त्यामुळे त्यांना हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट कसे मिळाले ? हा मोठा प्रश्न सर्वच तपास यंत्रणासमोर उभा राहिला आहे. त्यामुळेच या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता केंद्रीय मागासवर्ग आयोग तपासणी करणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे पूजा खेडकर या आणखी अडचणीत आल्या आहेत. त्याचबरोबर या तपासातून आणखी अनेक धागेदोरे हाती लागणार आहेत.