लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा सज्ज झाल्याचे पाहायला मिळत असून भाजपाच्या मुंबईतील कार्यालयात दोन दिवसीय मॅरेथॉन बैठक संपन्न झाली.
भाजपाचे निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि सह निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पार पडलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली असून भाजपा सक्षम उमेदवारांचा शोध घेणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.
नेमक्या कोणत्या देण्यात आल्या सूचना
- विधानसभा निवडणुकीला लवकरात लवकर जागावाटप करावं
- भाजपा विधानसभेला दीडशे जागा लढवण्याची शक्यता
- अजित पवारांना सोबत घेतल्याने असलेल्या नाराजीवरही भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत चर्चा
- मित्र पक्षांसोबत घेऊन पुढे जाण्याच्या वरिष्ठांनी सूचना दिल्याची माहिती
भाजपाच्या मुंबईत पार पडलेल्या दोन दिवसीय बैठकीनंतर आता पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपाचा 5300 पदाधिकाऱ्यांचं अधिवेशन संपन्न होणार असून या अधिवेशनात भाजपा विधानसभेचे रणशिंग्न फुंकण्याची शक्यता आहे