पुणे: पुणे शहरातून पुन्हा एकदा हीट अँड रन चा प्रकार समोर आला असून मांजरी मुंडवा रस्त्यावर भीषण अपघात घडला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील माजी नगरसेवक बंडू गायकवाड यांचा मुलगा सौरभ गायकवाड दारू पिऊन अपघात केला असल्याची शक्यता वर्तवली जाते. या अपघातात कोंबड्यांची वाहतूक करणार्या टेम्पोचे ड्रायव्हर आणि क्लीनर जखमी झालेत.
त्याचबरोबर सौरभ गायकवाड हा देखील जखमी झालाय. पुण्यातील मांजरी – मुंढवा रस्त्यावर झेड कॉर्नर येथे मंगळवारी पहाटे हा अपघात घडलाय. सौरभ गायकवाड हा त्याची MH 12 TH 0505 क्रमांकाची हॅरीयर कार घेऊन पहाटे पाच वाजता मुंढव्यातील घरी निघाला होता. त्यावेळी तो दारुच्या नशेत होता. त्यामुळे समोरुन येणार्या पोल्ट्री फार्म च्या टेम्पोला त्यानें धडक दिली.
सौरभ गायकवाडच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सौरभ गायकवाडचे वडील बंडू गायकवाड हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कार्यरत आहेत.