Accident

मद्य सेवन करून ॲम्बुलन्स चालवत घेतला पादचाऱ्याचा बळी; ॲम्बुलन्सच्या धडकेत एकाचा मृत्यू 

715 0

पुण्यातील हिट अँड रन च्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकतीच पुण्यात अशीच एक घटना घडली जात चक्क ॲम्बुलन्सच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील लोहगाव मधील फॉरेस्ट पार्क रस्त्यालगत असलेल्या भागात घडली आहे. तर गांभीर्याची गोष्ट म्हणजे ॲम्बुलन्स चालकाने मद्यप्राशन केल्याचे तपासात उघड झाले आहे.

सुरेंद्रसिंग शैलेंद्रसिंग कुम्पावत (वय 48, रा. श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, चंदननगर, खराडी) असे मृत्यु झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. तर संजय चण्णाप्पा मुल्लोळी (वय 26, रा. वाडेबोल्हाई, नगर रस्ता, ता. हवेली) असे ॲम्बुलन्स चालकाचे नाव आहे. संजय हा आजारी, जखमी प्राण्यांना दवाखान्यामध्ये ने- आण करणाऱ्या ॲम्बुलन्स वर चालक म्हणून काम करत होता. त्याला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी महेंद्रसिंग शैलसिंग कुम्पावत (वय-43 रा. नवी भाजी मार्केट, चंदननगर-खराडी रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. सुरेंद्रसिंह शनिवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास फॉरेस्ट पार्क परिसरातून जात होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या ॲम्बुलन्स ने सुरेंद्रसिंग यांना धडक दिली. या गंभीर अपघातात सुरेंद्र सिंह यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तर आरोपी संजय याला अटकही केली. मात्र त्यानंतरच्या तपासात संजय याने मद्य प्राशन केले असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ॲम्बुलन्स चालक हे अतिसंवेदनशील आणि जबाबदारी पूर्वक काम करणारी व्यक्ती जर मद्यप्राशन करून काम करत असेल, तर अनेकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे घडलेल्या या प्रकरणानंतर लोहगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!