शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवत धमकावल्या प्रकरणी पूजा खेडकर यांच्या आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल

170 0

शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवत धमकाऊला प्रकरणी पूजा खेडकर यांच्या आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची सुद्धा अनेक प्रकरणे आता समोर येत आहेत. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा काल एक व्हिडिओ माध्यमांच्या हाती लागला. त्यांनी जमीन खरेदीच्या वादातून शेतकऱ्यांनाच चक्क पिस्तूल दाखवत धमकावल्याचे या व्हिडिओत दिसून येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या प्रकरणी सदर शेतकऱ्यांनी पौड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्न केला असता त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली नव्हती. मात्र अखेर पूजा यांच्या आई वडिलांसह पाच जणांविरोधात पुणे ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्या शेतकऱ्याला मनोरमा खेडकर या धमकावत होत्या, त्यांनी काल पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांचे भेट घेतली. या भेटीनंतर मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आपल्याला धमकावल्याचा आरोप करणाऱ्या शेतकऱ्याच्या तक्रारीच्या आधारे पौड पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोरमा खेडकर (रा.नँशनल हाउजिंग सोसाइटी बाणेर पुणे), दिलीप खेडकर (रा.नँशनल हाउजिंग सोसाइटी बाणेर पुणे), अंबादास खेडकर (रा आंबी ता हवेली जि पुणे), दोन पुरुष बाउन्सर आणि दोन महिला बाउन्सर यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय दंडसहीता कलम 323, 504, 506, 143, 144, 147, 148, 149 आणि आर्म अँक्ट 3(25) एफआयआर दाखल करण्यात आली असल्याचे पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी सांगितले.

पंढरीनाथ कोंडीबा पासलकर (वय 65 रा.मु पो केडगाव) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. काही दिवसांपूर्वी मनोरमा खेडकर यांनी पूजा खेडकर यांच्या नावाने मुळशी मधील जमीन खरेदी केली होती. मात्र खरेदी केलेल्या जमिनीच्या बाजूच्या जमिनीवर देखील त्यांनी दावा सांगितला. शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला तेव्हा मनोरमा खेडकर या बाऊन्सर्स घेऊन शेतात आल्या. त्याचबरोबर त्यांनी चक्क पिस्तूल दाखवत शेतकऱ्यांना धमकावले. एवढेच नाही तर जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा जाळून टाकला तर पासलकरांच्या शेळ्यांवर कुत्रे सोडण्यात आले. त्यामुळे त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भातला पुढील तपास पौड पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!