विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडलं असून 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरल्यानं महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला आहे.
मिलिंद नार्वेकर यांच्याकडे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचे विश्वासू शिलेदार म्हणून पाहिलं जातं नार्वेकर यांनी शिवसेना सचिव पदाची जबाबदारी सांभाळली असून आता मिलिंद नार्वेकर हे विधान परिषदेचे आमदार असणार आहेत. मिलिंद नार्वेकरांच्या विजयाने आता उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर हे एकाच सभागृहामध्ये पाहायला मिळणार आहेत.