विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज सकाळी नऊ ते चार या वेळेत मतदान पार पडलं असून आता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गरजे यांना उमेदवारी देण्यात आली होती. शिवाजीराव गरजे आणि राजेश विटेकर यांचा आता विधान परिषद निवडणुकीत विजय झाला आहे