Breaking News ! दाढी कटिंग महागली ! सलून व ब्यूटी पार्लर व्यावसायिकांची दरवाढ

584 0

पुणे- सलून व ब्यूटी पार्लर व्यावसायिकांनी आपल्या सेवेमध्ये दरवाढ केली आहे. व्यावसायिकांच्या राज्यस्तरीय ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार शहरी व ग्रामीण भागात 30% दरवाढ करण्यात आली आहे. 1 मे कामगार दिनापासून याची अंमलबजावणी होणार आहे. 

असोसिएशनचे 52 हजार सलून व ब्यूटी पार्लर चालक सदस्य असून दरवाढ करण्यासाठी राज्यभरातून व्यावसायिकांकडून मागणी करण्यात येत होती.

सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसायाला लागणाऱ्या वस्तूंमध्ये झालेली भाववाढ, पेट्रोल, गॅस सिलेंडर, जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ, वाढलेली शाळेची फी, त्याशिवाय कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, लॉकडाऊननंतर व्यवसायामध्ये सुमारे 50% ग्राहकांची झालेली कमी या सर्व कारणामुळे सलून व्यावसायिकांना व्यवसाय करणे जिकिरीचे झालेले आहे. म्हणून ही दरवाढ केल्याचे सलून & ब्यूटी पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष नाभिक समाज नेते सोमनाथ काशिद म्हणाले. नागरिकांनी देखील दरवाढीला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

Share This News
error: Content is protected !!